दोन वाहनातून ७५ जनावरांची सुटका , तिघांना अटक

36

वाहनात कोंबून जनावरांची तस्करी; तिघांना अटक
मूल : गडचिरोलीवरून मूल मार्गाने दोन ट्रकमधून परप्रांतात कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मूल पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या नेतृत्वात एक चमू तयार करून नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, गडचिरोलीकडून एम. एच ४० बी. एल ६७२१ असलेला टाटा कंपनीचा व ए. पी. २९ यू ९३२६ या दोन वाहनांची तपासणी केली असता वाहनातून ७५ गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले. तीन आरोपींना अटक केली असून, तीन आरोपी फरार आहेत. जनावरांना चंद्रपूर दाताळा रोडवरील प्यार फाउंडेशन येथे सोडण्यात आले आहे. पुढील कारवाई मूल पोलिस करीत आहेत. कत्तलीसाठी जनावरे कोंबून नेत असल्याची गोपनीय माहिती मूल पोलिसांना मिळताच गांधी चौकात मंगळवारी पहाटे नाकाबंदी करून गडचिरोलीकडून येणाऱ्या दोन वाहनातून ७५ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सैलानी खाजामिया तग्याले (२८) रा. दापका (गु.) ता. मुखेड जि. नांदेड, समीर नजीर शेख (२८), मुनवर खान मदर खान (४०) दोघेही रा. गोयेगाव जि. आसिफाबाद या तिघांना अटक केली. तर, पुसाम वासू रा. लक्कडकोट ता. राजुरा, शेख अस्लम रा. गौरी जि. आसिफाबाद, मोहीन खान रा. गोयेगाव जि. आसिफाबाद या फरार आरोपींचा तपास सुरू आहे.