मूल : विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयी कार्य करणाऱ्या भूमिपुत्र ब्रिगेडची शाखा मूल शहरची ३० जुलै रोजी कार्यकारिणी गठित करण्यात आली. भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉ. अभिलाषा गावतुरे (बेहरे), प्रदेशाध्यक्ष डॉ. समीर कदम यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच फलकाचे अनावरण सुद्धा करण्यात आले.
यावेळी मूल शहराध्यक्ष म्हणून नितेश मायकलवार यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष विनोद निमगडे, सचिव सचिन आंबेकर,
सहसचिव मनोज मोहुर्ले, कोषाध्यक्ष संतोष चिताडे, प्रसिद्धीप्रमुख गौरव शामकुले तर सदस्य म्हणून पिंटू पिंपळे, सागर कामडे, आकाश आरेवार, दिवाकर झरकर, विनोद मिडपलवार, बादल मोहुर्ले, ओमकार महाजनवार, सुरेश मडकाम, धर्माजी चौधरी यांची निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच कालिदास खोब्रागडे चिमडा, उपसरपंच योगेश लेनगुरे, दुर्योधन घोंगडे, डेव्हिड खोब्रागडे, दिलीप गेडाम, दुशांत महाडोळे, सोमेश्वर मडावी, पद्माकर झरकर, दामोदर लेनगुरे, प्रदीप वाढई, राकेश मोहुर्ले, विक्रम गुरूनुले, श्रीकांत हस्ते, वैभव मंडलवार उपस्थित होती.