औषध विक्रेत्या युवकाने जीवन संपविले

58

नैराश्येमधुन सौरभने जीवन संपविल्याची शंका

मूल : स्थानिक चंद्रपूर मार्गावरील यश मेडीकल स्टोअर्सचे प्रोप्रायटर सौरभ यशवंत मरसकोल्हे (32) याने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपविल्याची घटना सकाळी 11 वा. चे दरम्यान मूल मध्ये घडली. काही दिवसांपासून सौरभ हा कावीळने ग्रस्त असल्याने सकाळी तो औषध घेण्यासाठी घरा बाहेर पडला. स्थानिक नातेवाईक आणि काही मित्रमंडळीशी भेटून घरी परतल्या नंतर कुटूंबातील सर्व मंडळी कामात व्यस्त असल्याची त्याने संधी साधली. सौरभ मरसकोल्हे वरच्या माळ्यावरील स्वतः च्या बेडरुमध्यें गेला आणि पंख्याला गळफास लावून जीवन संपविले. घटनेच्या काही वेळानंतर आई जेवणा करीता बोलाविण्यास गेली असता, सौरभच्या बेडरूमचे दार आतुन बंद होते. आईने त्याला आवाज मारला परंतू प्रतिसाद न मिळाल्याने तीने खिडकीमधून आत पाहीले तेव्हा सौरभ पंख्याला गळफास लावून जीवन संपविल्याचे दिसून आले. वडील व नातेवाईकांनी लागलीच दार तोडुन खोलीमध्ये प्रवेश केला. गळफास काढुन सौरभला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डाँक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतक सौरभ हा मार्गील काही वर्षापासून मेडीकल स्टोअर्स चालवित होता. सोबतचे अनेक वर्ग मित्र नोकरीला लागल, लहान भाऊ सहायक वन संरक्षक असून बहिण डॉक्टर आहे. परंतू बि.ई. पर्यंत शिक्षण घेवूनही आपल्याला नौकरी लागत नसल्याची खंत मृतक सौरभ नेहमी व्यक्त करीत असायचा. याच नैराश्यामधून सौरभने जीवन संपविले असावे. अशी शंका व्यक्त करण्यांत येत आहे. मृतक सौरभ हा येथील निवृत्त मुख्याध्यापक यशवंत मरसकोल्हे यांचा ज्येष्ठ चिरंजीव होता. तीन वर्षापूर्वी सौरभचे लग्न झाले होते. त्याचे पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ बहिण असा मोठा परिवार आहे. सौरभच्या अकाली जाण्याने नातेवाईक आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त करण्यांत येत आहे.