मूल तहसील कार्यालयात प्रशिक्षण शिबिर

61

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याबाबत, प्रशिक्षणास  राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात 1 जुलै 2024 पासुन सुरु झालेली आहे. योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी Narishakti Doot हे अॅप शासनस्तरावरुन विकसीत करण्यात आलेली आहे.
तसेच मा. जिल्हाधीकारी चंद्रपुर यांचे संदर्भिय आदेशान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सुलभता यावी, व अडचणी येवु नये साठी तालुक्यातील सर्व सेतु केंद्र ऑपरेटर CRP केंद्र यांचे ONLINE प्रशिक्षण आज दुपारी 2.00 वा. तहसिल कार्यालय मुल येथे पार पडली.तसेच प्रोजेक्टरच्या माध्यमातून पॉवर पाईन्ट प्रेझेन्टन्स सादर करण्यात आले तसेच मूल तहसील येथील आपले सरकार सेवा केंन्द्र तसेच तालुक्यातील कॉमन्स सर्वीस सेंन्टर सीएसी यांना माहिती देण्यात आली.

येथे तहसीलदार मृदुला मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार सेवा केंन्द्र आणि कॉमन सव्र्हीस सेंन्टर सीएससी ग्राहक सेवा केंद्राच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले. या शिबिरात तहसील कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी मूल यांच्यावतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मार्गदर्शन केले.

‘लाडकी बहीण योजना’ फॉर्म भरायचा कसा ?

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot

➡️अँप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे
➡️ अँप मध्ये नारीशक्तीचा प्रकार : जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा
➡️अँप मध्ये गेल्यावर सर्वात खाली ४ मेनू दिसतील त्यापैकी पहिला मेनू नारीशक्ती दूत वर क्लीक करावे.
➡️ क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर क्लीक करा
➡️ फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्यावी
➡️ माहिती भरताना जन्माचे ठिकाण : ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी.
➡️ त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी.
➡️ सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना –
आधार कार्ड मध्ये आधार कार्ड
अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे)
➡️ उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड
➡️ हमीपत्र
➡️ बँक पासबुक
➡️ सध्याचा LIVE फोटो
वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी.
➡️ त्यानंतर खाली Accept करावे
➡️ माहिती जतन करा वर क्लिक करा
➡️ थोडा वेळ थांबा….तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल
➡️ 4 अंकी OTP टाका
➡️ फॉर्म सबमिट करा.
आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल.
➡️ आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅब वर क्लीक करा.
➡️ तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज Scheme: pending मध्ये दिसेल.
अशा प्रकारे तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता.

यावेळी तहसील मूल येथील नायब तहसिलदार नंदकिशोर कुंभारे ,मूल येथील संवर्ग विकास अधिकारी राठोठ साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी चव्हाण साहेब तसेच मूल तालुक्यातील आपले सरकार सेवा केंन्द्र व कॉमन सव्र्हीस सेंन्टर सीएसी आदी उपस्थित होते.