आई वडिलांची सेवा आणि सन्मान करणे हे आद्य कर्तव्य -सोपान दादा कनेरकर यांनी सांगितले

45

मुल शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्थानीय स्व. कन्नमवार सभागृहात संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले प्रखर विचारवंत, युवा कीर्तनकार सोपानदादा कनेरकर यांच्या करियर आणि व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे वन, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ मंगेश गुलवाडे होते,
सोपान दादा यांनी विद्यार्थ्यांना जीवनाचे वेगवेगळे पैलू हसत खेळत विनोदी शैलीमध्ये समजाविले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई- वडिलांचे काय स्थान आहे, हे त्यांनी समजावून सांगताना विद्यार्थ्यांनी मेहनत करून आपल्या जीवनाचे ध्येय पूर्ण करावे असे सांगितले. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी शिकाव्यात, आणि वाईट मार्गाला न जाता आई-वडिलांची सेवा करावे असे सांगितले. जीवनामध्ये आई-वडिलांचा विश्वासघात होईल, असे कोणतेही कार्य करू नये, असा सल्ला त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.
व्यक्तिमत्व विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे फार महत्त्वाचे असते, असे सांगितले. नेहमी आनंदी राहा, इतरांपेक्षा स्वतःला कमी स्मजू नका, चुका झाल्या असतील तर मान्य करा अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. नकारात्मक विचाराने जीवनामध्ये यश मिळविणे कठीण आहे हे सुद्धा सांगितले.
या मार्गदर्शन शिबिर प्रसंगी तालुक्यातील वेगवेगळी महाविद्यालये आणि शाळेचे विद्यार्थी विद्यार्थेिनी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.