ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब@ 25 जुर्ले मुदतवाढ

53

JEE/NEET/MHT-CET Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील

Application for JEE/NEET/MHT-CET – Batch -2026 Training

ठरलेल्या उद्दिष्टा करिता गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल
Registration date extended till 25/07/2024

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE / NEET/MHT-CET. Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
अ. योजनेच्या लाभासाठी पात्रता :-.
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा / असावी तसेच विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
3. सन – 2024 मध्ये 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरीता पात्र राहतील.
4. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
5. विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आक्षणानुसार करण्यात येईल.
6. इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरीता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरीता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
7. विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील नमुद पत्त्यावरुन ठरविल्या जाईल.
ब. अर्ज करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :-
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate) 3. जातीचे प्रमाणपत्र ( Caste Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
5. 10 वी ची गुणपत्रिका
6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) 7. दिव्यांग असल्यास दाखला
8. अनाथ असल्यास दाखला