चंद्रपूर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ केवळ एक रुपयातमिळणार असून, १५ जुलैपर्यंत नोंदणी
करून यायोजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी आता केवळ 05दिवसांचा कालावधी शिल्लक असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यात बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्यातही पावसाचे प्रमाण, कीडरोग, इतर आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पीक घेतल्या जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविम्याच्या माध्यमातून संकटकाळात मदत होते. प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिल्यास त्यांना नुकसानभरपाई देता यावी, यासाठी योजना सुरू केलेली आहे.