कर्मवीर महाविद्यालय मुल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

45

मूल शिक्षण प्रसारक मंडळमुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मुल, येथे राष्ट्रीय सेवा योजनावरिष्ठ कनिष्ठ पथक व सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयीन परिसरात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या हस्ते वृक्षारोपण केले तसेच सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. चे शाखा व्यवस्थापक नरेश ब्राह्मणकर, शुभांगना गोडाणे वत्यांचे सहकारी यांनी महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण केले. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षकबनकर वप्रा. दिनेश महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित होते.