पंचायत समिती शिक्षण विभाग मुल तर्फे@मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत मुख्याध्यापकांचा सत्कार संपन्न

57

मूल : जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत पंचायत समिती शिक्षण विभाग मुल तर्फे राज्यात राबवलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शाळा यांचा पंचायत समिती मूल च्या सभागृहात सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी बी एच राठोड होते आणि प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी वर्षां पिंपरे होत्या. याप्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी दीक्षित आणि तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरचांदली तसेच इतर व्यवस्थापनाच्या विभागातून प्रथम क्रमांक विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मारोडा द्वितीय क्रमांक देवनिल विद्यालय टेकाडी आणि तृतीय क्रमांक श्रीमती इंदिरा गांधी हायस्कूल जुनासर्ला शाळेच्या मुख्याध्यापीका अनुक्रमे अल्का रेवतकर, आशा जोगी, शंकर चिचघरे, सुनील येनगंटीवार, राजेश सावरकर, बंडू रोहनकर यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला सत्कार, कार्यक्रमाला पिपरी दीक्षित येथील सरपंच श्वेता उरकुडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सौ वर्षा पिंपरे यांनी केले तर आभार आनंद गोंगले यांनी मानले.