अविवाहित युवकाचा मृत्यू

73

गटारात पडून युवकाचा मृत्यू
मूल : सांडपाणी वाहून नेणाऱ्या  गटारात पडून एका अविवाहित
युवकाचा मृत्यू झाल्याची घटना चिचाळा येथे गुरुवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली.
संतोष ऋषी कारमवार (२८), असे मृत युवकाचे नाव आहे. संतोष कारमवार हा सकाळी ११ वाजता घराबाहेर पडला. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली असता घराशेजारीच असलेल्या गटारात त्याचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १४९ अन्वये मर्ग दाखल केला असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

या घटनेने मूल शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पूढील तपास करीत आहेत.