शेतकऱ्यांनो १५ जुलै पर्यंत ‘केवायसी’ करा; अभावी पैशे शासनाकडे परत जाण्याची शक्यता

74

 मूल तालुक्यात माहे नोव्हेंबर 2023 मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे मुल तालुक्यातील शेतपिकांचे नुकसान झाले होते. शेतपिक नुकसान झालेल्या खातेदारांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान प्राप्त झाले आहेत. त्यानुसार शेतपिक नुकसान झालेल्या खातेदाराच्या याद्या E-Panchnama Payment Disbursement या पोर्टलवरुन ऑनलाईन अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने आधार कार्ड व बँक पासबुक प्रत तलाठी यांचेकडे सादर करणेबाबत वेळोवेळी सूचना व प्रसिद्धी देण्यात आली. अद्यापही काही खातेदार यांचे आधार कार्ड व बँक खाते क्रमांक प्राप्त न झाल्यामुळे त्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली नाही. करीता मुल तालुक्यातील सर्व पात्र खातेदार यांना सूचित करण्यात येत आहे की सदर पोर्टल वर माहिती अपलोड करण्याची, अर्ज मंजुरी व e-kyc प्रक्रिया करणे ही अंतिम संधी दि. 15/07/2024 पर्यंत देण्यात आलेली आहे.
तसेच सदर याद्या अपलोड झाल्यावर खातेदारांना e-kyc करणे अनिवार्य आहे व त्यानंतरच खातेदारांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. अपलोड झालेल्या याद्या सर्व ग्रामपंचायत येथे प्रसिध्द केलेल्या आहेत, त्याबाबत दवंडी देण्यात आलेल्या आहेत तसेच आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र येथे सुद्धा याद्या देण्यात आलेल्या आहेत. परंतु अद्यापही काही खातेदार यांनी e-kyc केलेले नाही.
सर्व पात्र खातेदार यांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांनी अद्यापही आधार कार्ड व बँक खाते क्रमांक दिलेले नाही संबंधित तलाठी यांना दि. 14/07/2024 पर्यंत सादर करावे व ज्यांनीe-kyc केलेले नाही त्यांनी जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन दिनांक 15/07/2024 पर्यंत e-kyc करून घ्यावे.तहसीलदार मुल

मागील वर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली. मात्र, अनेक शेतकऱ्यांची डीबीटी पोर्टलवर केवायसी झाली नाही. त्यामुळे त्यांना अजूनही मदत मिळाली नाही.
तालुक्यात केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांची संख्या दोन हजारांच्या वर आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी आलेले लाखो रुपये केवायसीअभावी शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना अतिवृष्टीमुळे पीक, शेतजमिनीचे नुकसान जुलै २०२३ अन्वये अपलोड करण्याची मुदत १५ जुलै रोजी समाप्त होणार असल्याने त्यापूर्वी तत्काळ केवायसी करण्याचे आवाहन मूल चे तहसीलदार — मृदुला मोरे  यांनी केले आहे.
मागील खरीप हंगामामध्ये जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. नदी-नाल्या काठावर असलेल्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. पिके पाण्याखाली आली. यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे शासनाने जाहीर केले होते. गाळ साचून, जमीन खरवडणे, अति पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाल्याने त्यांना हेक्टरी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. त्याअनुषंगाने ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला थेट जमा होणार होती. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा झाली आहे. मात्र, अजूनही बहुतांश लाभार्थी शेतकऱ्यांचे डीबीटी पोर्टलवर तसेच बँक खात्यांचे केवायसी नसल्यामुळे लाखो रुपयांची रक्कम प्रशासनाकडे जमा आहे.
नुकसानबाधित सर्व शेतकयांनी आपले अकाउंट नंबर, आधार नंबर आदींसह संपूर्ण माहिती संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याकडे सादर करावेत. ज्यांचे डीबीटी पोर्टलवर नावे अपलोड झाले. परंतु अजूनपावेतो त्यांना मिळालेल्या विशिष्ट क्रमांकावर ई-केवायसी केलेली नाही, अशांनी तत्काळ ई- केवायसी करून अनुदान प्राप्त करून घ्यावे.