पीक विम्यासाठी उरले तीन दिवस; मुल शहरातील प्रगती कॉम्यूटर येथे 400 शेतकरी सहभागी

30

शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षीही खरीप हंगामातील विमा उतरविण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांनी विमा उतरवलाय. अजूनही दोन दिवस शिल्लक असल्याने आकडा वाढणार आहे. तर विम्याअंतर्गत नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळू शकते.

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीक उत्पादनालाही फटका बसतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा; पण राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीही एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकरीही सहभागी होऊ शकतात.

 गेल्यावर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे  शेतकऱ्यांनी विमा काढला होता. यामध्ये मुल तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी सहभागी झाले होते. त्यातच गेल्यावर्षी दुष्काळ पडल्याने लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे यंदाही शेतकरी विमा उतरवू लागले आहेत. यासाठी १५ जुलै अंतिम मुदत आहे. तर शनिवारी सकाळपर्यंत अधिक शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले होते. उर्वरित दोन दिवसांत सहभागी शेतकऱ्यांचा आकडा  जाण्याचा अंदाज आहे.