मुल महसूल कर्मचारी आपल्या रास्त मागण्यासाठी राज्यव्यापी संपात सहभागी

32

मुल : महसूल कर्मचारी यांच्या महत्वाच्या व हक्काच्या मागणी करीता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने वतीने पुकारलेल्या आंदोलनात मुल येथील महसूल विभागातील सर्व कर्मचारी आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवित सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावरून कोणतीही सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाच्या भूमिकेबाबत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यासाठी व शासनाने लक्ष वेधण्यासाठी शासनास बेमुदत संपाची नोटीस देण्यात आलेली आहे. त्याकरीता महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, मुंबई यांनी शासनास खालीलप्रमाणे आंदोलनाचे टप्पे ठरवून संपाची नोटीस दिलेली आहे.
दि. १० जूलै २४ रोजी काळ्या फिती लाऊन काम करणे, दि. ११ जुलै २४ रोजी जेवणाच्या सुटीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शने करणे, दि. १२ जूलै २४ रोजी लेखनीबंद आंदोलन करणे, दि. १५ जूलै २०२४ रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करणे अशा पद्धतीने आंदोलन करून आपल्या मागण्या शासनास सादरकेल्या आहेत. वरीलप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत संपा लामा. राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, मुंबई यांचे आव्हानानुसार जिल्हयातील सर्व महसूल कर्मचारी ( वर्ग ३ व वर्ग ४) जिल्हा कार्यालयासमोर राज्यव्यापी संपात १०० टक्के सहभागी होत असल्याचे संघटनेने एका निवेदनाद्वारे कळविले आहे.