मूल शहर तालुक्यातील पूर परिस्थितीची तहसीलदार मृदुला मोरे यांच्या कडून पाहणी

64

सुमारे तीन दिवसांपासून मूल तालुक्यात सुरू असलेल्या कधी संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे तालुक्यातील उमा अंधारी या नद्यांना पूर आला. यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील मूल तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून उमा नदीवर पुलावर पाणी आले आहे. बंधाऱ्यावर देखील पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाची रिपरिप अखंड सुरू होती. तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहात आहेत. मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे तलाव व धरणे आणि नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून मूल तहसिल आपत्ती विभाग लक्ष ठेऊन आहे. आज दुपारी मूल तहसिलदार मृदुला मोरे , महसूल विभागातील कर्मचारी तसेच तलाठी,कोतवाल यांनी परिस्थितीची पहाणी केली. परिसराची पहाणी केली. पुराचे पाणी आल्याने या परिसराचा संपर्क तुटला आहे.मूल तालुका प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे.
मूल तालुक्यातील अंधारी नदीला पूर आल्याने चंद्रपूर-मूल, जानाळा-सुशी, मूल-करवन, मूल सावली, राजोली – पेटगाव मार्ग बंद झाले आहे. मूलमधील रामपूर वॉर्डात पुराचे पाणी शिरल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी येथील तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. मूल- ब्रह्मपुरी मार्गही बंद झाला आहेमूल तालुक्यातील अंधारी नदीच्या पुराचे पाणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतात. पोंभुर्णा-वेळवा व थेरगाव मार्ग बंद.

मूल ते नागपूर सावली गडचिरोली या मुख्य रस्त्यावर पाणी आले असून त्याठिकाणची पहाणी केली. तसेच उमा पुलावर जाऊन ही पूर परिस्थितीची पहाणी केली. नदी क्षेत्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे व प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनाचे पालन करावे असे तहसिलदार मृदुला मोरे यांनी जाहीर केले आहे मूल आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास खुला असून या ठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मूल ठाण्याचे पोलिस निरक्षक. मंडल अधिकारी,तलाठी,कोतवाल आदी उपस्थित होते.
नदीकाठच्या कुटूंबाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हावे अश्या तलाठी यांच्या मार्फत सूचना दिल्या आहेत.

बरेच दिवसापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. अनेक नक्षत्र कोरडे गेल्यानंतर कालपासून मोठ्या प्रमाणात तालुक्यात पाऊस झाला. सर्वत्र जोरात पाऊस झाल्याने शेतांचे, घरांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाला पुरेसा पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे,पिकाचे, घरांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क बंद झाला असून नुकसान झालेल्या शेतपिकाचे,घराचे निरीक्षण करून बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

“खरीप हंगामाला सुरुवात होताना शेतात पाणी साठल्यामुळे शेतीचे, शेतपिकाचे,घरांचे
नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी.”मूल तालुक्यातील शेतक—यांची मागणी