राजुऱ्यात गोळीबार, एकाचा मृत्यू

34

चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून आज 23 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता अज्ञात दोघांनी शिवज्योत सिंग देवल यांच्यावर गोळीबार केला. जिल्ह्यात सतत गोळीबाराचे सत्र सुरू असून चंद्रपूर व बल्लारपूर नंतर आता राजुरा शहरात गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान दुचाकीवर अज्ञात दोघांनी शिव ज्योत सिंग देवल यांच्यावर गोळ्या झाडल्या, यामध्ये देवल यांचा जागीच मृत्यू झाला.