मूल नगर परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या पथ विक्रेता समितीच्या आठ सदस्य पदांची पथ विक्रेत्यांची निवडणूक बिनविरोध

62

नगर परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या पथ विक्रेता समितीच्या आठ सदस्य पदांची दि. 30 जुर्ले रोजी बिनविरोध निवडणूक झाली.प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी मेश्राम साहेब निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ही समिती शहरातील पथविक्रेत्यांच्या हितासाठी कार्य करणार आहे.

सर्वसाधारण खुला गटातून श्री धर्मेद्र बालाजी सुत्रपवार खुला श्री अमित रामदास राउुत खुला सौ.नलिनी दिनेश आडपवार खुला महिला,श्री अरूण दादाजी खोब्रागडे अनूसूचित जाती,श्री धनराज गणपत कुमरे अनूसूचित जमाती ,सौ.वैशाली प्रमोद मशाखेत्री इतर मागास वर्ग महिला ,श्रीमती नूरजहा मजहरबेग अल्पसंख्यांक महिला राखीव श्री अरविंद देविदास बुटले विकलाग/दिव्यांग यांची नगर पथ विक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.

नगर परिषद, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत पथ विक्रेता
( उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ अन्वये नगर परिषद क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे विनियमन व नियंत्रणाकरिता नगर पथ विक्रेता समिती अनिवार्य आहे. या अधिनियम २०१४ अन्वये नगर पथ विक्रेता समितीत २० सदस्य असतील. यामध्ये
शासकीय विभाग व इतर मंडळे त्याच बरोबर पथविक्रेत्यांचे ८ सदस्य आहेत. हे आठ सदस्य नोंदणीकृत पथविक्रेत्यांमधून निवडणुकीद्वारे घेण्याचे अधिनियम २०१४ मध्ये
आहे.
नमूद या समितिमुळे शहरातील फेरीवाल्यांचे झोन निश्चित होतील. बेकायदेशीर व्यवसायाला आळा बसेल. गर्दी तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल. शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्यात भर पडेल. फेरीवाले अधिकृत होतील. त्यांना जबाबदारीने त्यांची कर्तव्ये पार पाडणे, फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणे, त्यानुसार जागा निश्चित करणे, पदपथावर विक्रीसाठी प्रमाणपत्र देणे, प्रमाणपत्र रद्द करणे, फेरीवाला झोन अथवा फेरीवालामुक्त झोन क्षेत्राची शिफारस करणे, विक्रीसाठी ठिकाणे, जागा निश्चित करणे, सार्वजनिक जागेत गर्दी होणार नाही, यासाठी विक्री वेळा निश्चित करणे, पतपुरवठा, विमा, सामाजिक सुरक्षेच्या इतर कल्याणकारी योजना तयार करणे आदींसह १८ प्रकारचे कामकाज या समितीद्वारे केले जाणार आहे.