जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडाचे नियोजन

148

चंद्रपूर, दि. 31 : शासन निर्णयानुसार जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून महसुल पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी 1 ते 15  ऑगस्ट पर्यंत दैनंदिन कार्यक्रम आखून देण्यात आला आहे.

त्याप्रमाणे 1 ऑगस्ट रोजी महसुल दिन साजरा करणे व महसुल पंधरवाड्याचा शुभारंभ म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत कार्यक्रम घेणे. यासाठी प्रत्येक तहसील कार्य क्षेत्रातील  मुख्यालयी / महापालिका मुख्यालयाच्या प्रभाग मुख्यालयी /नगरपालिका-नगरपंचायत मुख्यालय/ प्रत्येक अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्यालयी शिबिराचे आयोजन करावे. या शिबिरामध्ये योजनेची प्रचार प्रसिध्दी करणे. अर्जासोबत जोडणे आवश्यक असलेल्या आवश्यक सर्व प्रमाणपत्राचे वितरण करणे. योजनेकरीता अर्ज करण्याकरीता मार्गदर्शन करणे. परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारणे. रेशनकार्ड मधील दुरुस्ती/ नविन रेशन कार्ड देणे. आधारकार्ड मधील दुरुस्त्याबाबत कामकाज करणे अपेक्षित आहे.

            याबाबतचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रक सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व मुख्याधिकारी आणि सर्व बालविकास प्रकल्प अधिका-यांना पाठविण्यात आले आहे.