मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

41
चंद्रपूर, दि. 2 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी चंद्रपूर जिल्हातील विविध रिक्त पदे अधिसूचित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 12 वी, आय.टी.आय., डिप्लोमा, ग्रॅज्यूएट पोस्ट /ग्रॅज्युएट इत्यादी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निमार्ण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हातील शासकीय आस्थापना व नामांकित उद्योगांना आवश्यक असणारी रिक्त पदे या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत 12 वी पास उमेदवारांना दरमहा 6 हजार रुपये, आय.टी.आय. किंवा डिप्लोमा उमेदवारांना दरमहा 8 हजार रुपये तसेच ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांना दरमहा 10 हजार रुपये सहा महिन्यापर्यंत शासनातर्फे विद्यावेतन म्हणून मिळणार आहे. या वेबपोर्टलवर शासनाच्या विविध आस्थापना तसेच नामांकित कंपन्या यांच्यामार्फत रिक्त जागा अपलोड करणे सुरू आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी या पोर्टलवर नोंदणी करावी व या रिक्त जागांसाठी अर्ज करावा, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दुरध्वनी क्रमांक 07172 – 252295 येथे संपर्क करावा, असे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी कळविले आहे.