सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात मुनगंटीवार यांना निवेदन

46

मूल प्रतिनीधी  अखिल भारतीय सफाई मजदूर स्वतंत्र कामगार संघटन रजि.न.७२६२ महाराष्ट्र प्रदेश ट्रेड युनियन ऍक्ट १९२६ अंतर्गत दि.05/08/2024 नियोजन
भवन चंद्रपुर येथे श्री.मा.ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब मंत्री वने ,,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांना संघटनेच्या वतीने मुल नगर परिषदेतील नियमित, व कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात निवेदन देण्यात आले व मंत्री महोदयांनी सुद्धा त्वरित मुल नगरपरिषदेतील सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढा असे आदेश दिले तसेच अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपुर, श्री .मा. श्रीकांत जी देशपांडे साहेब त्यांना पण संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, त्यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील जी महातव ,व मुल तालुका शाखा अध्यक्ष श्री संदीप पारचे व त्यावेळी उपस्थित संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री अक्षय वाल्मीक यांनी चंद्रपूर दौरा दरम्यान मंत्री महोदयांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले , संघटनेचे इतर पदाधिकारी व सफाई कामगार नियोजन भवन चंद्रपुर येथे उपस्थित होते.