दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत परिवर्तन शहर संघा द्वारे मुल शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन सोहळा सकाळी बारा वाजता करण्यात आला. हा उद्घाटन सोहळा सुवर्ण जयंती हॉलमध्ये घेण्यात आला.
शहर उपजीविका केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व कार्यपद्धतीबद्दल महिलांना मार्गदर्शन माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असून शहरातील असंघटित कामगारांची नोंदणी करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शहराच्या मृदुला मोरे तहसीलदार मुल तसेच उद्घाटक यशवंत पवार नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी नगरपरिषद मुल यांच्या उपस्थित पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीकांत समर्थ पाणीपुरवठा विभाग, पंकज आसेकर कर निरीक्षक, अभय चेपुरवार आरोग्य विभाग, रितेश भोयर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आलेख बारापात्रे शहर समन्वय, हरीश कुमरे संघनक अभियंता उपस्थित होते.
उपजीविका केंदाचा मुख्य उद्देश शहरी गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालणे व शहरी गरिबांना माहिती आणि व्यवसायासाठी आवश्यक ते सहाय्य करणे, उपजीवीका केंद्र हे शहरी गरीब उत्पादक व ग्राहक यांना जोडणारा दुवा असेल तसेच वस्तू व सेवा यांची मागणी व पुरवठा जोडण्याची काम करेल.आभार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदाताई चल्लावार शहर संघ अध्यक्षा यांनी केले संचालन नलिनी आडपवार संयोगिनी
(NULM सहयोगीनी) यांनी केले.. प्रदर्शन सहसचिव चित्रा गुरनुले यांनी केले. या उद्घाटन प्रसंगी बचत गटातील भरपूर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल फुले, आशा येरणे, संजना मडावी, प्रिया सुरपाम, योगिता मारकवार यांनी सहकार्य केले.
Post Views: 48