ध्येयनिष्ठ आमदार: सन्माननिय सुधाकरराव अडबाले

28

सन्माननिय आमदार सुधाकरराव अडबाले सर हे शिक्षण क्षेत्रातील अस्थीरतेचं वातावरण स्थीर करण्याच्या चळवळीतुन निर्माण झालेले नेतृत्व आहे. शिक्षण क्षे़त्रात अनेक अवगुण , अन्याय व समस्या सोडविण्याचे काम हाती घेत, शिक्षण क्षे़त्राला समग्रतेची व व्यापकतेची दृष्टी देणारा ध्येयनिष्ठ आमदार म्हणुन महाराष्ट्रात प्रख्यात झालेले सुधाकरराव अडबाले सर हे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नवे सेनापती आहेत. यावर कोणाचेही दुमत असु नये.
वरीष्ठ सभागृहात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची समस्या सोडवणारे अनुभवी प्रतिनिधी नसल्यास, कर्मचा-यांना वेठीस धरणारे अन्यायकारक व जाचक शासन निर्णय लादले जातात. हे शासनाने आणलेल्या नव-नविन शासन निर्णयाने सिध्द होते. यामुळे संपुर्ण शैक्षणिक क्षे़त्राला अपंगत्व प्राप्त झाले. यासंबधाने राज्याच्या वरिष्ठ सभागृहात सन्माननिय आमदार अडबाले सरांची एॅन्ट्रªी झाली आणि शैक्षणिक क्षेत्रातील चित्र काही प्रमाणात का होईना आपणास बदल्याचे दिसते आहे.
अतिशय अभ्यासपूर्वक,विविध आयुधांचा वापर करीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समस्या सोडविण्याचे प्रामणिक प्रयत्न साहेबांनी केलेले आहेत.
‘‘विधीमडळांत मांडलेले ठळक व महत्वाचे मु˜े‘‘
1.राज्यातील शाळा व महाविदयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रिक्त पदे भरावी याची यशस्वी मागणी.
2 शिक्षंकाची गळपेची करणारा, संच मान्यतेचे सुधारीत निकषाबाबत शासन निर्णय रदद करणे.
3 राज्यातील सर्व शिक्षक व कर्मचा-यंाना सरसकट जुनी पेन्शन योजना लागु करण्याबाबत.
4 आदिवासी उपयोजन क्षे़़त्रातील (1901) शाळा / तुकडीवर कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे वेतन नियमित करण्याबाबत.
5 राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना 10-20-30 वर्षाची आश्वासीत प्रगती योजना तत्काळ लागु करण्याबाबत.
6 महानगरपालीका / नगरपालिका शाळेतील शिक्षक – शिक्षकत्तेर कर्मचा-यांची क्ब् च्ैध् छच्ै खाते सुरू करण्याबाबत.
7 राज्यातील समग्र शिक्ष अतर्गत कार्यरत करार कर्मचा-यांना शासन सेवेत कायम स्वरूपी सामावुन घेण्याबाबत.
8 राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत.
9 आदिवासी विभागातील शिक्षकांवर अन्याय करवारा ‘नो वर्क नो पे‘ शासनं निर्णय रद् करण्याबाबत.
10 विजाभज/ आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन दरमहा 1 तारखेला मिळण्याबाबत.
11 ओबीसी समजासाठी क्रिमिलेअर मर्यादा 20 लाख करण्याबाबत हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये मागणी.
12 खाजगी इंग्रजी/मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक-कर्मचा-यांना नियमानुसार वेतन देण्याबाबत प्रत्येक अधिवेशनात मागणी.
13 ओबीसी विद्याथ्र्यांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह व आधार योजना तात्काळ सुरू करण्याबाबत.
14 संच मान्यतेचे दुरूस्ती अधिकार विभागीय स्तरावर देण्याबाबत पावसाळी अधिवेशन 2024 मध्ये मागणी.
15 क्ब्च्ैध्छच्ैखाते नसलेल्या शिक्षक कर्मचा-यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे प्रलंबीत सर्व हप्त्ेा, तात्काळ अदा करण्याबाबत अधिवेशनात सतत मागणी.
अशा अनेक तारांकित व लक्षवेधी विधिमंडळात आमदार साहेबांनी लावून धरल्या आहेत यापैकी ब-याच मागण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत मागण्या पूर्व होण्यासाठी सभागृहात सतत संघर्ष व लढा सुरू आहे.

‘‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा‘‘
सन्माननीय आमदार सुधाकर अडबाले यांच्या संकल्पनेतुन प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या प्रलंबित,समस्या निवारणार्थ वि.मा.शि.संघाचा ‘समस्या तुमच्या,पुढाकार आमचा‘ हा उपक्रम सुरू करण्यात आला.
विदर्भातील विविध जिल्हयात गेल्या दिड वर्षात एकूण 33 सभा झाल्यात. समस्या निवारण सभेत अनुकंपाची प्रकरणे आॅन द स्पाॅट निकाती काढलीत. अनुकंपा प्रकरणे आॅन द स्पाॅट निकाली काढणारे, अडबाले सर हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले आमदार आहेत हे विशेष !
गेल्या दिड वर्षात अविरतपणे सर्व स्तरावरील शिक्षक व शिक्षक कर्मचा-यांच्या सुखी जीवनासाठी अहोरात्र धडपडणारा आमदार सुधाकरराव अडबाले हे ख-या अर्थाने ‘कर्मयोगी‘ आहेत. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता विवेकाने,निष्ठेने व श्रध्देने शिक्षक बंधू-भगीणीच्या अनेक समस्या अतिशय प्रामाणिकपणे सोडविल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील समस्या एवढया अग्रक्रमाने सोडवण्याचं, इतकं प्रामाणिक प्रयत्न करणारे शिक्षक आमदार फार दुर्मिळ आहेत. सुधाकरराव अडबाले हे याला अपवाद आहेत. येणा-या 10 आॅगस्ट 2024 ला साहेबांचा वाढदिवस आहे.
भाऊ,आपणास वाढदिवसाच्या माझे कडून व माझे कुटुंबियाकडून अनेक मंगलमय हार्दीक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो. आपला देह शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगाीन प्रगतीसाठी झिझावं हि आंतरिक ईच्छा.

विनोद मानापुरे
सावली तालुका अध्यक्ष
वि.मा.शि.संघ.