पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात साडेबारा फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

51

मूल जवळील भंजाळी येथील साडेबारा फुट असुन वजन तीस किलोच्या जवळपास अजगर; सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळलाजवळच असलेल्या भंजाळी गावातील अजगर आढळून आला. शेतात रोवण्याचे काम सुरू असतांना काही महिलांना शेताच्या बांधावर एक भलामोठा अजगर साप दिसला काही सर्पमित्रांच्या मदतीने अजगराला पकडून जंगलात अधिवास क्षेत्रात सोडण्यात आले. सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला असल्याने समस्त ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.मूल तालुक्यातील भंजाळी येथील शेतकरी मनीष भांडेकर यांचे शेतात रोवण्याचे काम सुरू असतांना काही महिलांना शेताच्या बांधावर एक भलामोठा अजगर साप दिसला. अतीशय घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने तात्काळ संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे यांचेशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच संस्थेचे सदस्य अंकुश वाणी ला सोबत घेऊन शेतातील त्या भल्या मोठ्या अजगराला स्थानिक दोन युवकांच्या मदतीने पकडले.भंजाळी हे गाव पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात येत असल्याने ही माहिती वनरक्षक विनोद कस्तूरे यांना देण्यात आली. भल्या मोठ्या अजगराला पकडुन गावकरी आणि महिला मजुरांना भयमुक्त केल्यामुळे त्यांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांचे आभार  मानले.   अजगराची लांबी जवळपास साडेबारा फुट असुन वजन तीस किलोच्या जवळपास आहे.यामुळे अजगराला मुक्ती आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.