“हर घर तिरंगा अभियाना” अंतर्गत मूल मध्ये नगर परिषदेच्यावतीने काढली मोटार सायकल रॅली

30

मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम

९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभर सुरू असलेल्या “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत सोमवारीमूल मध्ये नगर परिषदेच्यावतीने मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तसेच यादरम्यान मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती देण्यात आली आहे.
अभियानाचा एक भाग असलेली मोटरसायकल रॅली नगरपरिषद प्रांगणातून सोमवारी काढण्यात आली. नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत या रॅलीत सहभाग नोंदविला. नगरपरिषदेतून सुरू झालेली रॅली बाजारपेठ, नगरपरीषद च्या पटागणापासून तर गांधी चौक,चंद्रपूर रोड,नागपूर रोड,शहरातील रस्तामधून , मेन रोड,  बस स्टॅन्ड या मार्गाने पुन्हा नगरपरिषद सांगण्यात आली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

मोटारसायकल रॅलीमध्ये मुख्याधिकारी,प्रशासकीय अधिकारी , शहर अभियंता , कार्यालय निरीक्षक , कर अधिकारी , यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

शासन निर्देशानुसार नगर परिषदेच्या वतीने ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून मोटरसायकल रॅली द्वारे वेश्या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती, देशप्रेम निर्माण व्हावे, मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्याप्रती अभियान राबविण्यात येत असतो शहरातील नागरिकांनी उपक्रमात सहभागी होत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर आदर्श आचारसंहितेचे पालन करत तिरंगा ध्वज लावावा. क्रांती दिनाचे औचित्य साधून नगर परिषदेच्यावतीने नगर परिषदेच्या प्रांगणात नागरिकांसाठी तिरंगा ध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. -यशवंत पवार , मुख्याधिकारी.