29 ऑगस्ट रोजी मुल येथील कर्मवीर कॉलेज@बहुजन कल्याण विभागाच्या योजनांच्या माहितीसाठी तालुका स्तरावर मेळावे

57

बहुजन कल्याण विभागाच्या योजनांच्या माहितीसाठी तालुका स्तरावर मेळावे

चंद्रपूर, दि. 13 : इतर मागास बहुजन कल्याण विभागात राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत  पोहचविण्यासाठी 15 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत तालुकास्तरीय मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्हात खालीलप्रमाणे तालुकानिहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

16 ऑगस्ट रोजी भद्रावती येथील नीलकंठराव शिंदे कॉलेज, 16 ऑगस्ट रोजी वरोरा येथील नीलकंठराव शिंदे कॉलेज, 20 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथील सामाजिक न्याय भवन, 20 ऑगस्ट रोजी बल्लारशाह येथील सामाजिक न्याय भवन, 21 ऑगस्ट रोजी गोंडपिपरी येथील चितांमणी सायन्स कॉलेज, 21 ऑगस्ट रोजी राजूरा येथील कल्याण नर्सिंग कॉलेज, 22 ऑगस्ट रोजी सावली येथील पंचायत समिती, 22 ऑगस्ट रोजी ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय, 23 ऑगस्ट रोजी सिंदेवाही येथील सर्वोदय महाविद्यालय, 24 ऑगस्ट रोजी पोंभुर्णा येथील चिंतामणी सायन्स कॉलेज, 29 ऑगस्ट रोजी मुल येथील कर्मवीर कॉलेज, 30 ऑगस्ट रोजी  चिमूर येथील ग्रामगीता कॉलेज, 30 ऑगस्ट रोजी नागभिड येथील गोविंदराव वाराजुरकर कॉलेज, 31 ऑगस्ट रोजी जिवती येथील विदर्भ कॉलेज, 31 ऑगस्ट रोजी कोरपना येथील आर्ट कामर्स कॉलेज येथे मेळाव्यांचे आयोजन होणार आहे.

सदर तालुकानिहाय मेळाव्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बहूजन कल्याण विभागाचे सहायक संचालक आशा  कवाडे यांनी केले आहे.