एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय रासेयो विभाग व्दारा हर घर तिरंगा रैली चे आयोजन

24

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व्दारा गोंडवाना, विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार दिं 14, आगस्ट ला हर घर तिरंगा रैली चे आयोजन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ राजेश चिमनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे, सह रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ मेघमाला मेश्राम यांनी केले.

हर घर तिरंगा रैली च्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये तिरंगा राष्ट्रीय ध्वजा प्रती राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्या दृष्टीने विविध घोषवाक्य देत रैली काढण्यात आली.
रैली मध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर रैली यशस्वीतेसाठी प्रा.अशोक बनसोड प्रा.डाॅ.आनंद वानखेडे ,प्रा.लोकेश दवे॔ प्रा आवारी,प्रा.समाधान उमक,प्रा.विक्की नैताम,रमेश गुरनुले, बंडु वरवाडे व रैली सुरक्षतेसाठी पोलिस विभाग गांधी चौक, चंद्रपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.