विद्यार्थ्यांनी ग्रामगीतेतील जीवन मुल्य अंगिकारणे गरजेचे आहे – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर

55

ग्रामगीता ही मानवी जीवनाची आचार संहिता असुन विविध विषयांवर मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी ग्रामगीतेतील जीवन मुल्य अंगीकारणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.
मुल येथील आयोजित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा केंद्र प्रमुख सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यानिमित्त नवभारत विद्यालय मुल येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य अशोक झाडे यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अविनाश जगताप, राजेश सावरकर, वसंतराव ताजने, चंद्रशेखर पिदुरकर आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा तालुका मुल, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा समिती मूल आणि श्री गुरुदेव बचत गट मुल च्या वतीने मार्च २०२४ ला माध्यमिक शालांत परीक्षेत ग्रामीण विभाग गुणवंत विद्यार्थी प्रथम- समिक्षा संजय घोगरे, द्वितीय- गुंजन कैलास अलोने, तृतीय- सरगम अतुल अर्जुनकर, शहरी विभाग प्रथम- इशान संतोष राचर्लावार , द्वितीय- अनुष्का प्रविण ठावरी, तृतीय- संकेत कोमदेव कोल्हे आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवंत विद्यार्थी ग्रामीण विभाग प्रथम -श्रुती रविंद्र कोटरंगे, द्वितीय- श्रुतिका सुनिल मांदाडे, तृतीय- सोनल संजय मोहुर्ले, शहरी विभाग प्रथम- संस्कृती श्रीकांत मुप्पीडवार, द्वितीय- दीर्घायुषी कर्णवीर भुरशे , तृतीय -अथर्व रविंद्र फरतडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,गौरव चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. ग्रामगीता जीवन विकास परीक्षा केंद्र प्रमुख सचिन बल्लावार, निलेश माथनकर,राजु गेडाम, योगराज वरठी, गणेश मांडवकर, सुखदेव चौथाले, विजय लाडेकर यांचा प्रमाणपत्र, पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रविण परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण आणि बेबस चित्रपटात बालकलाकार म्हणून भुमिका केलेल्या हर्ष बोदलकर यालाही गौरविण्यात आले यावेळी वाढदिवसानिमित्त किसनराव वासाडे तसेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बंडोपंत बोढेकर आणि शरदराव सहारे यांचाही आयोजकांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव पिजदुरकर, सुत्रसंचलन निलेश माथनकर तर आभारप्रदर्शन किसनराव वासाडे यांनी केले.राष्ट्रवंदनेने कार्यक्रम संपन्न झाला.