कला निकेतन संगीत क्लास मधील तीन विद्यार्थी विशेष योग्यतेत ( मेरिट )मध्ये

41

मूल,
नुकत्याच जाहीर झालेल्या गांधर्व महाविद्यालय मंडळ , मुंबई येथील शास्त्रीय संगीताच्या प्रवेशिका प्रथम या गायन विषयाच्या परीक्षेत कला निकेतन संगीत क्लास मधील तीन विद्यार्थी विशेष योग्यतेत ( मेरिट )मध्ये उत्तीर्ण.
मूल सारख्या ग्रामीण भागात शास्त्रीय संगीताचे फार महत्व वाटत नाही शिकणाऱ्यांची संख्याही फार कमी असते. मात्र अशाही परिस्थितीत शास्त्रीय संगीतामध्ये विद्यार्थी घडविण्याचे कार्य सुरू आहे. काही इच्छुक विद्यार्थी बाहेरगाव वरून येतात.
काही विद्यार्थी नोकरी करून शिकणारे आहेत. परंतु अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद या क्षेत्रात बघायला मिळत नाही. T V वर लहान मुलांचे कार्यक्रम बघताना कला उफाळून आलेले काही हौसी व्यक्ती शिकण्याच्या इच्छा घेऊन येतात मात्र ते महिने दोन महिन्याच्या पलीकडे शिकायला येत नाही असे मत संगीत क्लासचे गुरुजी अशोक येरमे यांनी व्यक्त केले.
मे २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये सौ. अश्विनी रणदिवे, सौ. माधुरी बनसोड, आकांक्षा खोब्रागडे, या विद्यार्थिनी विशेष योग्यता ( मेरिट ) मध्ये उत्तीर्ण झाल्या. त्या उत्तम गाईकाही आहेत, त्याबद्द्ल त्यांचे संगीत कला निकेतन परिवाराच्या वतीने व शहरातही सर्व स्तरामधून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे आणि, पुढील संगीत क्षेत्रात अशीच प्रगती करीत असोत अशा शुभेच्छा देण्यात येत आहे.