मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेळी पालनकर्ता मुनीम रतीराम गोलावार वय ४१ वर्ष हे काल वन परिक्षेत्र चिचपल्ली, उपक्षेत्र मूल येथील कक्ष क्रमांक ७५२ मध्ये शेळ्या चराईसाठी गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही माहिती काल सायंकाळी उशीरा मिळाल्याने आणि शेळ्या चारणारा घरी न आल्यामुळे श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर व प्रियांका वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांचे आदेशानुसार आज सकाळी मूल चे क्षेत्र सहाय्यक मस्के, वनरक्षक सूधिर ठाकुर,पवन येसाम्बरे,शितल चौधरी, शुभांगी गुरनुले,अतीशिघ्र कृती दल चंद्रपूर चे कर्मचारी तथा संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार,दिनेश खेवले, अंकुश वाणी, रीतेश पीजदूरकर, प्रतीक लेनगुरे,हौशीक मंगर, यांनी मिळून शोध मोहीम राबवली तेव्हा जंगलात त्याचा मृतदेह मिळाला.वनविभाग व पोलीस प्रशासना मार्फत घटना स्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतकाच्या पत्नीला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका आर.वेलमे , यांचे हस्ते ५०००० रूपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आली.यावेळी पि.डब्लू.पडवे, क्षेत्र सहाय्यक केळझर, पि.डी.खनके क्षेत्र सहाय्यक महादवाडी, उमेशसिंह झिरे संजीवन पर्यावरण संस्था,मूल वनरक्षक आर.जे.गुरनुले जानाळा, व मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते.