मेडीकल प्रॅक्टीशनर असोसिएशन ने नोंदविला कोलकत्ता येथील अत्याचाराचा निषेध, कारवाईची मागणी

33

मूल : कोलकत्ता येथील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षित महिला डॉक्टर वर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी व पीडीतेच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मुल येथील मेडिकल प्रॅक्टिशनर असोशियनने केली आहे. सदर घटनेच्या निषेधार्थ एक दिवस वैद्यकीय सेवा बंद ठेवून निषेध नोंदविला आहे.
उपविभागीय अधिकारी यांचे मार्फतीने देशाचे पंतप्रधान यांना सादर केलेल्या निवेदनात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घडलेली घटना हिंसाचाराचे दोन आयाम समोर आणणारी असून महिलांसाठी असुरक्षितता आणि सुरक्षेच्या अभाव यामुळे सदर घटना घडली असून यामुळे देशाच्या विवेकाला धक्का पोहोचला असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे साथीच्या रोग कायद्यात केलेल्या सुधारणा 2019 च्या मसुदा रुग्णालय संरक्षण विधेयकात समाविष्ट करावा. सर्व रुग्णालया मधील सुरक्षा अतिशय कडक करून संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करावे. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी. आदी मागण्या करतांना घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन करावे व पीडित महिलेच्या कुटुंबाला सुरक्षिते सोबतच नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष रेड्डीवार, उपाध्यक्ष डॉ. दिनेश व-हाडे, सचिव डॉ. विनोद चौधरी, खजिनदार डॉ. उज्वल बोकारे, डॉ. मार्टिन अझीम डॉ. आशिष कुलकर्णी, डॉ. प्रमोद गोंगले, डॉ. सायली बोकारे, डॉ. प्रवीणा व-हाडे डॉ. मनीषा शेंडे, डॉ, तीरथ उराडे, डॉ. दिलीप शिरपूरवार, डॉ. सुखदेव बरडे, डॉ. पद्माकर लेनगुरे, डॉ. संजय बुक्कावार आदी उपस्थित होते.