सुभाष उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हर्षल सुनिल गुरूनुले@शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र

26

मूल/ प्रतिनिधी
येथील सुभाष उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी हर्षल सुनिल गुरूनुले हा मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 8 वी च्या शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. हर्षल हा शहरी सर्वसाधारण गटातून शिष्यवृत्तीधारक ठरल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आपल्या यशाचे श्रेय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम,मार्गदर्शक शिक्षक बंडु अल्लीवार , राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार,
यांना दिले आहे. शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.