मगच मिळेल योजनेचा लाभ! कर्जमुक्ती योजनेचे पैसे मिळाले नाहीत हे करा

59

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत  अधिक शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण न केल्याने त्यांना ५० हजार रुपयांच्या लाभापासून वंचित राहावे लागले ` या शेतकऱ्यांना हा लाभ मिळण्यासाठी आता ७ सप्टेंबरची मुदत देण्यात आली असून या मुदतीत त्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात आले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना आधार प्रमाणीकरण करून नोंद पावती देतांना प्रेरणा कॉम्यूटर मूल येथे नागरीकांना सन 2018—19 शामराव रावूजी सिडाम विकास संस्थेचे नाव मत वी आई का आर नं कर्ज परत फेड केलेली रक्कम 48960 रूपये पावती आपले आधार प्रमाणीकरण झाले अशी पावती आपले सरकार सेवा केंन्द्र प्रेरणा कॉम्यूटर मूल येथे आज नागरीकांना 9 ते 15 नागरीकांनी आधार प्रमाणीकरण करून देण्यात आले.
मूल तालुक्यातील उर्वरीत नागरीकांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून घेण्यात यावे.
राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांत पूर्ण कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांनी घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ठरलेल्या मुदतीत परतफेड केली आहे, अशांना जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात आला आहे.
पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. दिवाळीपासून बंद असलेल्या या योजनेचे पोर्टलदेखील प्रोत्साहन अनुदान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी (दि.19) सहकार आयुक्तांनी व्हीसीद्वारे सुतोवाच दिले आहे. याच आठवड्यात सदरचे पोर्टल सुरू होण्याचे संकेत आहेत. मधल्या काळात या योजनेच्या पोर्टलमध्येच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मात्र आधार प्रमाणिकरण रखडले होते. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सन 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करीत अंमलबजावणी सुरू केली होती. सोबतच प्रोत्साहन अनुदान योजना देखील सुरू केली. साडेचार वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यां कर्जमाफीकरिता अर्ज केले होते. यातील लाभार्थी कर्जमाफीकरिता पात्र झालेत. यापैकीशेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाल्याने यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. परंतु, यातील शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. तर मधल्या काळात या योजनेचे पोर्टल मध्येच बंद केल्याने शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले होते. असे एकूण शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असताना त्यांच्या कर्जमाफीचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा धुसर झाली होती. परंतु, प्रोत्साहन योजनेचे पोर्टल पुन्हा सुरू केल्याने याच धर्तीवर कर्जमाफीचे देखील पोर्टल सुरू करण्याबाबतचे सुतोवाच सहकार आयुक्तांकडून मिळाले आहे. त्यामुळे आता कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यातील शेतकऱ्यांना आधी आधार प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे. 

प्रोत्साहनपर लाभासाठी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
चंद्रपूर, दि. 16 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंमलात आलेली असून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या 13 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार, प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या 33356 शेतकऱ्यांसाठी महा-आयटीने 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सदर कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा एस.एम.एस. संबंधित शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. तथापी याबाबत संबंधित बँकांनी देखील योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना व्यक्तीश: कळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने त्वरीत कार्यवाही करावी. चंद्रपूर जिल्ह्यातील सदर योजनेअंतर्गत पात्र असलेल्या खातेदारांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, या कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.