चंद्रपूर दि. 23 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय (कृषी भवन), पोलिस वाहतूक कार्यालयासमोर, चंद्रपूर येथे 26 व 27 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.