सर्व्हर डाउनमुळे पीकपाहणीसाठी वाढल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

35

१ ऑगस्टपासून ई-पीकपाहणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे १५ दिवस तर अॅप व्यवस्थित काम करीत नव्हते. पुन्हा काही दिवस ॲप सुरळीत चालले; परंतु मागील आठवड्यापासून अॅप व्यवस्थित काम करीत नसल्याने शेतकऱ्यांना पीकपेरा ऑनलाइन नोंदविण्यासाठी अडचणी येत आहेत. सर्व्हर डाउनचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
यावर्षी पिकाचा पेरा ऑनलाइन नोंदविण्यासाठी मोबाइल अॅपचे नवीन व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. हे व्हर्जन काही दिवस शेतकऱ्यांना पीकपेरा नोंदविण्यासाठी चांगले काम करीत होते; परंतु पुन्हा सर्व्हर डाउनच्या समस्येमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. जिल्ह्यात धान, सोयाबीन, तूर, तीळ, कापूस आदी पिकांची लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात जोरदार पाऊस झाल्याने रोवणीची कामे आटोपली आहेत. मोबाइल अॅपद्वारे पीकपेरा ऑनलाइन नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना १ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर असा ४५ दिवसांचा कालावधी दिलेल आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना आपल्य पिकाचा पेरा ऑनलाइन नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर तलाठ्यांना १ महिना सदर पीकपेरा नोंद करण्यासाठी लागणार आहे. ई-पीक नोंदणी गरजेची का?
■ ई-पीकपाहणी अॅपवर पीक नोंदणी न केल्यास सात-बारावर जुन्याच हंगामाची नोंद आढळते. त्यामुळे चालू हंगामात नुक- सानभरपाई किंवा विमा तसेच अन्य अर्थसा- हाय्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतो. याशिवाय शासनाकडून प्रोत्साहन निधी, धान विक्रीची सोय आदींपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.