मुख्याधिकारी यांना विविध प्रश्नांवर लक्ष घालण्याची केली विनंती
मुख्याधिकाऱ्यांकडून विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन
मुल चे नवनियुक्त मुख्याधिकारी संदीप दोडे यांचे ग्राहक पंचायत मूल च्या पदाधिकाऱ्यांनी कडून स्वागत…
येथील नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी संदीप दोडे यांची ग्राहक पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शहरातील स्वच्छतेबरोबरच
लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी केली. श्री संदीप दोडे यांनी ही ग्राहक पंचायत च्या पदाधिकार्यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला.
श्री दोडे यांनी अलीकडेच मुख्याधिकारी म्हणून मूल नगरपालिकेमध्ये रुजू झालेत दरम्यान आज ग्राहक पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत
शहरातील विविध प्रश्नांवर लक्ष वेधले यात प्रामुख्याने शहरातील स्वच्छतेच्या विषयावर नियोजन बद्दल काम करण्याची मागणी त्यांनी केली शहरात बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो त्यामुळे हा कचरा सर्वत्र पसरून दुर्गंधी पसरते त्यामुळे सदरचा कचरा कचराकुंडीत टाकण्या बाबत तसेच संबंधित परिसरात सीसीटीव्ही बसवून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मागणी केली
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या व मोकाट गुरांची संख्या नेहमीच जाणवते याबाबत पालिकेने उपाययोजना हाती घ्यावी मोकाट गुरांच्या मालकांना पूर्वकल्पना देऊन तंबी द्यावी त्यानंतरही त्यांच्याकडून कुठलाही प्रचार आल्यास दंडात्मक कारवाई हाती घ्यावी अशा विविध मागण्या केल्या श्री दोडे यांनीही याबाबत पदाधिकाऱ्यांना सकारात्मकता दर्शवत येणाऱ्या काळात या सर्व समस्या मार्गी लावण्यात चे आश्वासन दिले.
यावेळी ग्राहक पंचायत मूल चे उपाध्यक्ष अशोक मैदमवार, सचिव , रमेश डांगरे, प्रा.प्रमोद मशाखेत्री,बादल करपे,प्रणय बांगरे आदी पदाधिकारी आदी उपस्थित होते.