आधार कार्डचं ‘हे’ काम आताच करुन घ्या! तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे

43

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोट्यावधी महिलांनी अर्ज केले.

१ जुलैपासून या योजनेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जवळपास दीड कोटी पात्र महिलांना योजनेचा पहिला हफ्ता मिळल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. परंतु, काही महिलांच्या बँक खात्यात पैसे अजूनही जमा झालेले नाहीत. कारण महिलांचं बँक खातं आधार कार्डसोबत लिंक नाहीय.

महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलं आहे, त्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, हे तपासून पाहावं. जर लाडकी बहीण योजनेसाठी आधारकार्ड लिंक नसेल, तर तातडीनं आधार कार्ड लिंक करुन घ्या. कारण सरकारकडून देण्यात येणारी रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड लिंकसंदर्भात माहिती देणार आहोत.

1) लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्डसोबत बँक खातं लिंक होणं आवश्यक आहे.
2) या योजनेच्या माध्यमातून सर्व लाभार्थी महिलांना बँक खात्यात डीबीटी माध्यमाद्वारे आर्थिक सहायत्ता रक्कम पाठवण्यात येईल.
3) लाडकी बहीण योजना आधार कार्ड लिंकच्या माध्यमातून मिळणारी रक्कमेतून महिला गुंतवणूकही करु शकतात.
4) राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे.
5) आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील.
6) आधार कार्डसोबत बँक खातं लिंक केलं आहे की नाही, याबाबत तुम्हाला माहित नसेल, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे तपासून घ्या
‘ही’ कागदपत्रे असतील तरच तुम्ही आधारकार्डला बँक खात्याशी लिंक करू शकता

१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) रहिवासी दाखला
४) उत्पन्नाचा दाखला
५) जातीचा दाखला
६) मोबाईल नंबर
७) बँक खातं पासबुक