कापूस / सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप (कापूस पीक / सोयाबीन पीक) करिता अर्ज करण्याची मुदतवाढ
31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपसाठी अर्ज करणे करीता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२०२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.