हिंगोली जिल्ह्यातील तलाठी हत्या, प्रकरण,दोषींना कठोर शिक्षा द्या:-तहसीलदारांना निवेदन

37

हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजे येथील तलाठी संतोष पवार (ता.वसमत) यांची कार्यालयात घुसून निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघाच्या मूल शाखेच्यावतीने एकदिवसीय कडकडीत कामबंद आंदोलन केले.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, तलाठी संतोष पवार यांची हत्या एका तलाठ्याची नसून ही समग्र महसूल व्यवस्थेची हत्या आहे. या घटनेतील दोषींवर कठोर गुन्हे नोंदवून हा खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावा. तलाठी, मंडळ अधिकारी यांचे संरक्षणार्थ शासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी करून विदर्भ पटवारी संघाच्या मूल शाखेने काम बंद आंदोलन केले.

यावेळी दिवंगत तलाठी संतोष पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कामबंद आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष महेश कडवलवार, सचिव तुम्केश्वर चव्हाण, कोषाध्यक्ष डेझी गायकवाड, आर.जी. नन्नावरे, पी.आर. वडस्कर, एस.के. नगराळे, एस.आर. दुवावार, व्ही.आर. कामडी, एम.एस. गजभिये, पी.डी. कवाडे, मंगेश गांडलेवार, मुकेश पेंदोर, शंकर पिदूरकर, आकाश बगडे, दीपक उरकुडे, बी.डी. मेश्राम, के.पी. उईके, मीना कावळे सहभागी झाले होते.