राष्ट्रीय पशुधन अभियान जिल्ह्यस्तरीय कार्यशाळा जिल्ह्यतील 170 शेतकरी बांधवानी घेतला लाभ

24

पशुसंंवर्धन विभाग,चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत जिल्ह्यस्तरीय तांत्रिक प्रशिक्षण व कार्यशाळा यंग रेस्टॉरंट,जनता काॅलेज चौक,चंद्रपूर येथे घेण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्ह्य पशुसंवर्धन उपायुक्त डॉ मंगेश काळे यांनी केले.प्रमुख उपस्थिती सनदी लेखापाल CA नागपूर सुभाष रहांगडाले, संचालक ग्रा.स्वंय.प्र.चंद्रपुर प्रफुल्ल आल्लुरवार,महा.आर.आर.नेट.नागपूर अनिकेेत लिखार,जिल्ह्य पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.उमेश हीरुडकर,सहा.आयुक्त पशुसंवर्धन डाॅ. वरठी, डाॅ.समीरण सास्तुरकर,पविअ वर्धा डॉ.सुरेद्र पराते होते.प्रथम दिव्पप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी डॉ.सुरेंद्र पराते यांनी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेबद्दल,सि.ए.सुभाष रहांगडाले,सि.ए. गायकवाड यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल DPR व होणार्या चुका व निराकरण,प्रफुल्ल आल्लुरवार व कल्पेश माहुरे यांनी बॅक कर्ज प्रक्रीया,संचालक अनिकेेत लिखार यांनी फिरते पशुपालकांसाठी राष्ट्रीय पशुधन अभियान, डॉ.सास्तुरकर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गतशेळीपालन,कुक्कुटपालन, वैरण विकास व जिल्ह्य पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मंगेश काळे,जिल्ह्य पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.उमेश हीरुडकर यांनी राष्ट्रीय पशुधन अभियानबाबत मार्गदर्शनात एकुण प्रकल्पाच्या शासन पन्नास टक्के अनुदान असुन उर्वरित विस टक्के लाभाथिॅ हिस्सा व अंशी टक्के बॅक कर्जमर्यादा असून वीस लाख ते एककोटींपर्यंतशेळीपालन,कुक्कुटपालन,वराहपालन ,वैरण विकास प्रकल्प असल्याचे सांगुन शेतकर्यानी शेतीसोबत पशुपालन व राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळीपालन कुक्कुटपालन, वैरण विकास योजनेचा लाभ घेऊन उधौजक बनुन आथीँक जीवनमान सुधारण्याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी यशस्वी पशुपालक आशीष देवतळे यांनी त्यांनी केलेल्या कुक्कुटपालनबाबत व या योजनेंतर्गत 1कोटीचा प्रकल्प शासनाकडे पाठविण्यात आल्याचे मनोगतात व्यक्त केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक डाॅ.उमेश हीरुडकर यांनी संचालन डाॅ.आंनद नेवारे,आभार डाॅ.प्रमोद जल्लेवार यांनी केले.कार्यशाळेला जिल्ह्यतील राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेबाबत आनलाईन केलेले व 170 पशुपालक उपस्थित होते.कार्यशाळेसाठी सहा.आयुक्त पशुसंवर्धन डाॅ.वरठी,डाॅ.आंनद नेवारे,डाॅ.हेंमत घुई,राहुल नानवटकर यांनी परीश्रम घेतले.