नवभारत विद्यालय मुल येथील कुमारी सलोनी भीमदर्शन डोहणे हिचा श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या विशेष सहकार्याने निबंध स्पर्धा विषय – गाव हा विश्वाचा नकाशा या स्पर्धेत तिचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला. तिला ग्रामगीताचार्य माननीय बंडोपंत बोढेकर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम 1500/- देऊन गौरविण्यात आले. या निबंध स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक झाडे सर यांना शाळेतील सहभागाबद्दल ज्येष्ठ नागरिक श्री.एकनाथ गुंडोजवार सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. स्पर्धेचे प्रमुख श्री निलेश माथनकर , राजू बोढे सर यांना मुख्याध्यापक श्री झाडे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले. यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.