महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने@लाडकी बहीण योजनेला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

28

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची मुदत ही गेल्या 31 ऑगस्टला संपूष्ठात आली होती. त्यानंतर ज्या महिलांनी अद्यापही या योजनेत अर्ज केले नाहीयेत.

त्यांना योजनेला आणि निधीला मुकावं लागणार? असा प्रश्न महिलांना पडला होता.मात्र या महिलांना आता सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत ही महिन्याभरासाठी वाढवली आहे. या संदर्भातला जीआरही समोर आला आहे.त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

खरं तर लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरूवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली होती. मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेच अर्ज करण्याची मूदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. आता ही मुदत देखील संपली होती. त्यात अनेक महिलांना अद्याप या योजनेत अर्जच करता आला नव्हता. अनेकांचे अर्ज देखील रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने आला लाडकी बहीण योजनेला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे महिलांना आता 30 तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील महिला वर्ग योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी सरकारची धारणा आहे. राज्याच्या महिला आणि बालविकस विभागाने जुलै महिन्यात या योजनेला सुरुवात केली आणि 17 ऑगस्ट पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे प्रत्येकी दीड हजार रुपयाप्रमाणे तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाली.

महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते झाले की उर्वरित महिलांना देखील लगेच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना – योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. – ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. बदलाचे साक्षीदार नव्हे.. शिल्पकार व्हा… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी व्हा !