विद्यार्थासाठी नविन शैक्षणीक धोरणावर व मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन

23

आज दि.६ सप्टेंबरला २०२४ ला कर्मवीर महाविद्यालय मूल,येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या  डाॅ.अनिता वाळके मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनात विद्यार्थासाठी नविन शैक्षणीक धोरणावर व मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

           नवे शैक्षणीक धोरण २०२०(NEP)हे या वर्षापासुन स्वतंत्रपणे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व संपुर्ण राज्यात लागु झाले आहे.हे धोरण व्यवसायाभिमुख असल्याने विविध क्षेत्रात अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणारे व व्यक्तिमत्वाचा विकास घडवुन जीवनमान उंचावणारे आहे असे प्रतिपादन विद्यार्थानां मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ अनिता वाळके मॅडम यांनी केले.तसेच मराठी मुख्य व मराठी उप आणि त्याला जोडून येणारे पुरवणी विषय VEC,SEC,AEC व त्याच्यांं  अभ्यासक्रमाची सखोल माहिती दिली. प्रा भूषण वैद्य  यांनी प्रत्येक विषयाचे पेपर स्वरुप, प्रात्याक्षिक , गुणांक व श्रेयांक यांची सविस्तर माहिती देऊन विद्यार्थांचे  मार्गदर्शन केले.प्रत्येक विद्यार्थांनी त्यांनी निवडलेले विषय सांगितले.  

         या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलोनी अलाम व आभार नंदिनी तिरुमहारीवार यांनी केले .विद्यार्थानां नवे शैक्षणीक धोरण व मराठी  विषयाच्याअभ्यासक्रमा विषयीची ओळख व्हावी, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावे व प्रात्येक्षिक चे विषय माहिती व्हावे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास  बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.