मायच समजू शकते ‘ मायेची ममता’ ! नवजात वासराला त्या मायलेकींनी वाचविले !

26

स्त्री हिच मायेची माया समजूशकते किंबहूना पहाटेच्या काळोखात त्या अबोल गोमातेचारडवेला हंबरडा ऐकूण, वेदना जाणूनस्वताचा जीव धोक्यात घालून गोंडसनवजात वासराला घाण वाहून नेणाऱ्या ८ ते १० फुट खोल बंद गटारातून वाचविणारी ती माय वंदनीयठरली आहे.

दि.१४ सप्ते. ला पहाटेच्या काळोखात मन सुन्न करणारी व चिंतनकरायला लावणारी ही घटना मूल शहरातील. मूल- चंद्रपूरमहामार्गावरील वाडॅ १५ मधील हीघटना. महामार्गाचे दोन्ही बाजूला८ ते १० फुट खोलीचे भुयारी गटार जेशहरातील घाण पाणी सतत वाहून नेत असतात. या गटारावरील अनेक चेंबर
न.प.च्या दुर्लक्षतेने उघडे पडलेले आहेत. या बंद भुयारी गटाराला लागून असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या भुखंडावर गायीने वासराला जन्म दिला. मात्र जन्मल्यानंतर ते गोंडस वासरू खुल्या चेंबर मधून भुयारी गटारात पडले. घटना पहाटे ४ ते ५ ची. सर्वत्र काळोख. वासराच्या विरहाने त्या मुक्या गायीने चौफेर हंबरडा सुरू केला. कदाचित ती मदतीसाठी लोकांना बोलवीत असावी. पहाटे या महामार्गावरूनमानसिंग वॉक करणारे शेकडो जणअसतात. त्या अबोल मातेची वेदनाकुणालाच समजली नाही. लगतच्याघरी किरायाने राहणाऱ्या श्रीमती महेशकर व त्यांची मुलगी डॉ.पुजायांनी गोमातेची वेदना हेरली व गटारात शोधाशोध सूरू केली.दरम्यान ते चिमुकले वासरू गटारात चेंबर पासून कितीतरी मिटर अंतरावर सरकत गेले. सौ.महेशकर जिवाची चिंता न करता हातात टाचॅ घेऊन गटारात उतरल्या व चक्क घाण पाण्यातून त्या वासराला उचलून आणले व डॉ.पुजाच्या मदतीने चेंबर मधून बाहेर काढले.वासराच्या विरहाने विव्हळणाऱ्या गोमातेचे बाळाला लगेच चाटून स्वच्छ केले.वासरुही पान्हयाला भिडला. मात्र ती गोमातामोठ्या कॄतज्ञतेने सौ.महेशकर यांनापाहात होती.अतिशय भावनिक क्षण
लहान मोठ्यांना अनुभवता आला.सवॉत नवलाची गोष्ट म्हणजे ते नवजात गोंडस वासरू वारंवारसौ.महेशकर यांच्याच पदरात येऊनघुसत होता. सौ.महेशकर यांनी मायेची ममता मायच (स्त्री) समजू शकते हीनैसर्गिक भावना सिद्ध करून दाखविली आहे.सौ.महेशकर काकूपरिसरात मुक्या जनावरावर प़ेम करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. आजवर त्यांनी अनेक मांजरांना व कुत्र्यांच्या पिलांना खाऊ पिऊ घालूनमोठे केले आहे. काही वर्षाआधी त्यांचा एकुलता एक मुलगा अपघाताने हिरावला. पुत्र विरहाचीवेदना त्याचेशिवाय अधिक कोण जाणूशकतो.

आज त्यांनी अबोल गोमातेला पुत्र विरहाच्या मोठ्या वेदनेतून सोडविले. ते मुके जनावर कॄतज्ञता
बोलून व्यक्त करू शकले नाही मात्र तीअबोल गोमाता व तिचे वासरू ज्यानजरेने महेशकर काकूंनान्याहाळत होते ते बघता स्वर्गसुखाचे समाधानमाता असलेल्या काकूंना नक्कीच लाभले असेल.

विशेष म्हणजे ती गाय मोकाटजनावरांच्या टोळक्यातली आहे. जनावरांची भावना,वेदना मात्र अशा
अवस्थेत गोमातेला वाऱ्यावर सोडणाऱ्यातिऱ्हाईत मालकाला कळत असेल यात शंकाच आहे. नगर परिषद प़शाशनाला तर मोकाट जनावरांच्याबाबतीत तर काही देणे घेणे नाही.अन्यथा कमितकमी भुयारी गटारा वरील चेंबर खूले राहीले नसते.