तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी त्रस्त@शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी संकेतस्थळावर

47

वसतिगृह प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुरू आहे. परंतु अर्ज भरताना संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. शुक्रवारी शेवटच्या दिवशीही अशीच अडचण राहिली तर मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहामध्ये २०२४-२५ मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुरू आहे. २० सप्टेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.परंतु ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. संपूर्ण प्रोफाइल भरल्यानंतर संबंधित जिल्हा, विभागातील उपलब्ध वसतिगृहाची यादी व त्यांचा पसंतीक्रम देताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे नाव व
पसंतीक्रम न देताच अर्जाचे शुल्क भरल्यामुळे त्यांचा प्रवेश अर्ज लॉक झालेला आहे, व नंतर त्यामध्ये वसतिगृहाचे पसंतीक्रम देण्याचा पर्यायच उपलब्ध नाही अथवा अर्ज सेव्ह किंवा सबमीट करण्याची सोय उपलब्ध नाही. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. किंवा वसतिगृहाचा पसंतीक्रम न दिल्यामुळे महाविद्यालयापासून दूरच्या वसतिगृहात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील संपूर्ण माहिती असल्याचे खात्री करून अर्ज भरावा

नविन अर्जासाठी :-

विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:
२. वडिलांचे संपूर्ण नाव :
३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :
४. आधार कार्ड क्र. :
५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :
६. अर्जदाराचे वय :
७. अर्जदाराचे लिंग :
८. आईचे संपूर्ण नाव :
९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :
१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :
१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :
१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :
१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )
१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:
१७. अभ्यासक्रम :
१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :
१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :
२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):
२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:
२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.
• प्रवेश वर्ष / दिनांक
• उत्तीर्ण महिना / वर्ष
• प्राप्त गुण
• एकूण गुण
याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती

• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव
• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :
• शाखा
• खातेक्रमांक
• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे

१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :

रिनिवल अर्जासाठी :-

चालू वर्षाच्या बोनाफाईड
मागील वर्षाचे गुणपत्रक
जातीचा दाखला
चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक
भाडे करारनामा
रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
मेस / भोजनालय बिलाची पावती
रीनिवल अर्ज सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही

ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे