मूल : मागील 10 दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या विरव्हाचे कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे यांचा मृत्तदेह आज रविवारी (ता. 22 सप्टेंबर) मूलच्या उमानदीमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सिंदेवाही तालुक्यातील मौजा विरव्हा येथील कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे हे मागील अनेक दिवसांपासुन सिंदेवाही येथील मदनापूर वार्डात राहात होते. कुटुंबियांनी सिंदेवाही येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक शंका उपस्थित केली होती.
10 दिवस लोटुन नंदकिशोर परत न आल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले होते. दरम्यान रविवारी (ता. 22 सप्टेंबर) रोजी सकाळी मूलच्या उमानंदीमध्ये त्यांचा मृत्तदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मृत्तदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.