चिखली -कन्हाळगाव येथील अमोल झरकर या व्यक्तीने शेत शिवारात कीटकनाशकांची फवारणी करतांना

29

फवारणीकरिता शेतमजूर मृत्यूच्या दारात उभा राहून फवारणी करत असतो. फवारणीमुळे विषबाधा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. मूल तालुका हा भातपिकाचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या तालुकात मोठ्या प्रमाणामध्ये धानाची शेती केली जाते. फवारणीसाठी शासकीय पातळीवर मार्गदर्शन केले जाते. विविध माध्यमातून शेतकरी आणि शेतमजुरांना फवारणी कशी करावी हे सांगितले जाते.
परंतु शेतातील वास्तव वेगळेच आहे. अनेक शेतमजूर म्हणतात आम्ही एकदाच फवारणी करत नाही. कित्येक वर्षांपासून फवारणीचेच काम करत असतो. परंतु कधी विषबाधा झालेली नाही.सुरक्षेच्या साधनांचे काय ? शेतकऱ्यांच्या जवळ गॉगल आणि हातमोजे नसतात. मग मजुराकडे येणार तरी कसे? जीवाला धोका आहे पण प्रश्न पोटाचा आहे, असा थेट सवाल शेतमजूर विचारीत आहेत.

व्यथा फवारणी करणाऱ्या शेतमजुरांची
साहेब; धोका माहित आहे, पण प्रश्न रोजी रोटीचा आहे जीवाला धोका आहे हे आम्हाला कळत नाही का? पण प्रश्न पोटाचा आहे.पाठीवर पंप घेऊन विषाची फवारणी करत मृत्यूच्या दारात उभे असतो हे वास्तव मूल तालुक्यातील चिखली कन्हाळगाव येथील अमोल झरकर या व्यक्तीने शेत शिवारात कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांचे आहे. कापूस ला रोगराईन होवू नये तसेच कीटकनाशकांची धान लागवडीनंतर धानाला कडा करपा व इतर रोगराईने ग्रासलेल्या धानाला कीटकनाशकांची होवू नये या करीता शेतमजूर आपल्या पाठीच्या मागे पंप घेवूनकाम करीत असतात.

शेतमध्ये कापूस पेरल्यानंतर शासनाच्या योजना जसे कि पिक विमा भरला का असं विचारला असता त्यांनी कोणत्याही प्रकराचा विमा काढलेले नाही आम्हाला शासकीय योजना कधी माहीतच होत नाही,शेतक—यांच्या योजना आम्हाला कुणी कळवतच नाही असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करीत होता.

तालुकास्तरावर मार्गदर्शनाची गरज
जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला अठरा विश्व दारिद्र्य असताना पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाची पर्वा न करता विषाची फवारणी करत असतो. परंतु तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे फवारणी करणाऱ्या शेतमजुरांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात नाही. शासनाने कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वर्षातून दोनदा तालुकास्तरावर मार्गदर्शन केंद्र सुरु करावे-मूल तालुक्यातील चिखली कन्हाळगाव येथील अमोल झरकर