मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे.
तत्पुर्वी महिलांना काही महत्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. जर या गोष्टी 29 सप्टेंबरआधी नाही झाल्या, तर महिलांना योजनेच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे.
लाडकी बहीण योजना सूरू झाल्या अनेक महिलांना झटपट फॉर्म भरले होते. मात्र या नादात महिला काही चूका करून बसल्या होत्या. या चुकांमुळेच त्यांना योजनेचा निधी मिळू शकला नव्हता. मात्र आता ज्या महिलांना निधी मिळाला नाही आहे, त्यांना आता 29 सप्टेंबरला येणाऱ्या तिसऱ्या हप्त्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अजूनही तुमच्याजवळ 5 दिवसांचा वेळ आहे. तुम्हाला तुमची चूक सुधारता येणार आहे.खरं तर अर्जात बँकेचे तपशील भरताना महिलांनी त्यांच्या चालू खात्याचे नंबर भरले होते. पण ज्या महिलांनी त्यांची ही खाती भरली होती. ती खाती आधारशी जोडलेलीच नव्हती. त्यामुळे महिलांना फटका बसला होता आता आणि त्यांना अर्ज दुरूस्ती करावी लागली होती. त्यामु्ळे जर तुमच्याकडून ही अशीच चूक झाली असेल तर आधी बँक अकाऊंट जर अर्जात भरले असेल तर ते त्वरीत बँकेशी जोडून घ्या. दोन चार दिवसात ते बँकेशी जोडली जातात. माय आधार या साईटवर गेल्यावर ऑनलाईन देखील बँस खाती आधारशी जोडली जातात. त्यामुळे या चार-पाच दिवसात तुम्हाला हे काम करता येणार आहे.जर 29 सप्टेंबरआधी हे काम झालेच नाही तर तुम्हाला 4500 या महिन्यात तरी विसरावे लागतील. आता नवीन अर्ज भरणाऱ्यांनी देखील अशीच चूक केली असेल तर त्यांना देखील 1500 रूपये मिळणार नाही आहेत. त्यामुळे तुमच्याकडून जर अशीच चूक झाली असेल तर लगेच दुरूस्त करून घ्या.
‘इतक्या’ महिलांनी घेतला योजनेचा लाभ
”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
”सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.