आदिवासी समाज बांधवांचा तहसील समोर एक दिवशीय धरणे आंदोलन!

16

मुख्यमंत्र्याच्या वक्तव्य विरोधात

मूल,
उच्च न्यायालयच्या निकालानंतरही पंढरपूर येथे सुरु असलेल्या धनगर जातीच्या उपोषण कर्त्यांना असंविधानिक वक्तव्य करून धनगड धनगर ही एकच जमात असल्याचा जी आर काढण्याचे आश्वासन देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्ताव्याच्या निषेधार्थ मूल तहसील कार्यालयासमोर शेकडो आदिवासी बंधू भगिनी शालेय व महाविद्यालईन मुलींनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
सदर धरणे आंदोलन अशोक येरमे, संपत कन्नाके, लक्ष्मण सोयाम, किशोर पेंदाम, चंद्रशेखर जुमनाके यांचे नेतृत्वात घेण्यात आला. आंदोलन भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन व मालर्पण करून करण्यात आले. यावेळी समाजातील मुलींनी आदिवासी क्रांतिगीते गायली. सरकार विरोधी घोषणा दिल्या. अशोक येरमे, संपत कन्नाके, लक्ष्मण सोयाम,किशोर पेंदाम, चंद्रशेखर जुमनाके,हिरालाल भडके, प्रियंका गेडाम, संजय मेश्राम, यांनी सरकारच्या आदिवासी विरोधी वक्ताव्याबद्दल आणि धनगर जात ही जमात नाही ती अनुसूचित जमातीची कोणतीही संस्कृतीक निकषे पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे धनगर जातीला आदिवासीच्या सूचित समाविष्ट करू नये, अन्यथा राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटतील, तिव्र आंदोलणे होतील अशी आक्रमक भाषणे झाली. प्रमुख दहा मागण्या घेऊन हे धरणे आंदोलन करण्यात आले.आंदोलन दुपारी 12-30 ते 4-00 वाजेपर्यंत करण्यात आले. उपविभागीय अधिकारी चरडे यांना देण्यात आले, यांचे मार्फत महामहीम राज्यपाल आणि मुख्यमंत्री मान. एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.

याकरिता मनोहर मडावी, अरविंद मेश्राम, हेमंत कन्नाके, शिनदेव गेडाम, संजय गेडाम, यांनी परिश्रम घेतले, संचालन मनोहर मडावी यांनी केले.भर पावसातही आंदोलन करते शेकडोच्या संख्येने सहभागी होते.