वनहक्क पट्टेदार शेतकऱ्यांचे पीएम किसान नोंदणी कॅम्प संपन्न.

19

मुल(प्रती) :-शासनाच्या आदेशानुसार तहसील कार्यालय मुल येथे वन हक्क पट्टे धारक शेतकऱ्यांचे पीएम किसान नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला वनहक्क पट्टेदार शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पि एम किसान योजनेतर्गत शेतकऱ्यांनायोजनेचा लाभ देण्यासाठी शासनाकडून सर्व वनहक्क पट्टे धारक शेतकऱ्यांचे पीएम किसान योजना कॅम्प.दिनांक 3 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता तहसील कार्यालय मुल येथे आयोजित करण्यात आले.प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास सुरुवात झाली. आता योजनेत बदल करून वनहक्काचे पक्के पट्टे असणान्या शेतकन्यां देखील या योजनेत समावेश केला गेला. त्यांची नोंदणी देखील सुरू झाली आहे.शासनाच्या नियमानुसार केवळ खातेदार शेतकरी पी एम किसान योजने साठी पात्र होते.त्यातून वनहक्कधारक शेतकरयांना वगळण्यात आले होते. परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना सुद्धा पी एम किसान योजनेचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.शासनाच्या पात्र यादीतील वन हक्क धारक पट्टा असलेले शेतकरी पीएम किसान योजना कॅम्पला दिनांक 3 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता तहसील कार्यालय मुल येथे योग्य दस्ताऐवज घेऊन उपस्थित होते. सर्व उपस्थित वन हक्क प्राप्त शेतकर्यांची पी एम किसान योजनेला नोंदणी करून देण्यात आली. ज्यांच्याकडे काही कागदपत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.पि एम किसान नोंदणी कॅम्पला सेतू संचालक प्रमोद मशा खेत्री, प्रकाश चलाख, कैलास कावटवर, संगी ड वार तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी, वनहक्क पट्टे धारक शेतकरी उपस्थित होते.