मूल शहरात कामगार नोंदणी साठी तुफान गर्दी

32

कन्नमवार सभागृहात बांधकाम कामगारांना 1 रु मध्ये फॉर्म भरून मिळताय

मूल येथील कन्नामवार सभागृहात तसेच क्रिडासंकूलन मध्ये शनिवार व रविवार 5 व 6 आॅक्टोबर रोजी कामगार नोंदणी बांधकाम कामगारांना एक रूपयात फॉर्म भरून देण्यात येत असतांना दरम्यान, लाभार्थीनी तुफान गर्दी केली होती. झालेली गोंधळाची परिस्थिती पाहता अखेर पोलिस दल पाचारण करण्यात आले. बाहेरगावाहून मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. नियोजनाचा अभाव पाहता पात्र लाभार्थीना भर उन्हात तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.
कामगार कल्याण योजनेंतर्गत तहसिल कार्यालयाच्या मागे तसेच पंचायत समिती कार्यालयाच्या मागे वाटप सुरू असताना इतर ठिकाणाहून आलेल्यांना
ग्रामपंचायत निहाय बांधकाम कामगारांना देऊन तिथेच लाभार्थीना साहित्याचे वाटप करण्याची मागणी केली जात आहे. होणारी गर्दी आणि लोकांची होणारी गैरसोय पाहता गावनिहाय व्यवस्था करण्याचे बोलले जात आहे. यातच दलाली प्रवृत्ती यात असल्याने यात नेहमीच गोंधळाची स्थिती निर्माण होते. बाहेर गावातील लोकांना होत असलेले पाहता मूल शहरातील
ग्रामीण ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला.नेटबंद आहे असं सांगण्यात आले तेव्हा काही प्रमाणात गर्दी कमी झाली. कुठे कुठे राजकीय वशिलेबाजी सुरू असल्याने सामान्य महिलांना आल्या पावली परतावे लागले. याची दखल शासनाने घेण्याची मागणी होत आहे.
महिलांची फरपट, विरोधात उमटला सूर
 कन्नमवार सभागृहात बांधकाम कामगारांना 1 रु मध्ये फॉर्म भरून मिळताय असल्याचे सकाळी १० वाजेपर्यंत कुठलीही सूचना नव्हती. असे असतानाही बाहेर गावावरून मोठ्या संख्येने महिला पहाटेपा- सूनच क्रिडासंकूल तसेच कन्नमवार सभागृह मूल परिसरात गोळा झाल्या होत्या. शासनाकडे किंवा कामगार संघट- नेकडे’कानाही, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मात्र, येथे आलेल्या महिलांमध्ये शासना- विरोधी सूर उमटताना दिसून आला.