पीक संरक्षणासाठी ‘सौर झटका’ मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे, तसेच जंगलालगत शेती कसणाऱ्या पिकांचे संरक्षण करता यावे यासाठी वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपण ७५ टक्के अनुदानावर दिले जाते. यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविली जात आहे. या योजनेतून वर्षभरात ६०१ शेतकऱ्यांना सौर ऊर्जा झटका मशीन व कुंपणाचा लाभ देण्यात आलेला आहे. या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो. जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती वनाला लागून आहे. पासून हजारो
२००८
अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे वितरित करण्यात आल्याने हे शेतकरीसुद्धा जंगलालगत शेती कसतात. अशातच जिल्ह्यात गत पाच वर्षांपासून वाघ, बिबट, अस्वल व तीन वर्षांपासून रानटी हत्तींचे हल्ले वाढल्याने मानव वन्यजीव संघर्ष निर्माण झाला. यामुळे शेतकरी एकटे- दुकटे जंगलालगतच्या शेतात जाण्यास घाबरतात. परिणामी शेती पिकांची वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नासधूस होते. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी राज्य शासनाच्या वन विभागामार्फत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेचा विस्तार करून सौर ऊर्जा कुंपणाचा समावेश १६ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आला.
सौर ऊर्जा कुंपण साहित्याकरिता प्रतिलाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपयांपैकी जी कमी असेल त्या रकमेचे थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)
पद्धतीने अनुदान दिले जाते. या
योजनेत सौर ऊर्जा साहित्याच्या किमतीच्या अनुषंगाने उर्वरित २५ टक्के किंवा अधिकच्या रकमेचा वाटा लाभार्थ्यांना उचलावा लागतो.
प्रथम प्राधान्य कोणाला?
वनवृत्तनिहाय वन्यप्राण्यांकडून झालेल्या शेतपीक नुकसानीच्या मागील तीन वर्षातील गावनिहाय घटनांच्या संख्येचा आधार घेऊन प्रथम प्राधान्य देत संवेदनशील गावांची निवड केली जाते. सदर लाभार्थ्याकडे गावातील शेतीचा ७/१२ गाव नमुना ८ अथवा वनहक्क कायद्याअंतर्गत पट्टा वाटप केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वन गुन्हा असल्यास अपात्र
ज्या व्यक्तीवर वन गुन्हा नोंदविण्यात आला असेल अशा व्यक्तीस योजनेचा लाभ मिळणार नाही. तथापि, एखाद्या व्यक्तीवर वाटप झालेल्या
वनपट्ट्यासंदर्भात अतिक्रमणाचा गुन्हा नोंदविला गेला असेल तर त्या व्यक्तीला योजनेचा लाभ दिला जाईल, असे शासन निर्णयात नमूद आहे. वैयक्तिक किंवा सामूहिक चेन लिंक फेन्सिंग यापैकी एकच लाभ दिला जातो.
जंगलालगतच्या शेती पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण
करण्याकरिता
शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा कुंपण योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी
महाडीबीटी पोर्टलवर
अर्ज करावेत. जंगलालगतच्या शेतात अगदी सकाळी जाऊ नये.
Home आपला जिल्हा Breaking News वन विभाग सरसावला : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर करा अर्ज@पीक संरक्षणासाठी ‘सौर झटका’